माझ्या मागे आणि पुढेही ‘दत्ताच’…

244
2
Google search engine
Google search engine
Google search engine

रणजित देसाई ; येत्या २४ तारखेला ऐतिहासिक निकाल दिसेल…

मालवण, ता. ९ : विरोधकांकडे मैदानात उतरून पराभव करण्याची हिंमत नसल्यानेच त्यांनी भीतीपोटी दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचे षड्यंत्र रचले. मात्र माझ्या मागे आणि पुढेही दत्ताच असल्याने मला विजयाची खात्री आहे. कसोटी खेळण्यापेक्षा टी-२० खेळण्यात मजा आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या साथीमुळे येत्या २४ तारखेला ऐतिहासिक निकाल निश्चितच दिसेल असा दावा अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांनी येथे केला.
कुंभारमाठ येथे अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्या प्रचारार्थ तालुका स्वाभिमान पक्ष आणि तालुका भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, उमेदवार रणजित देसाई, तालुकाध्यक्ष अशोक तोडणकर, राजा गावडे, सुहास हडकर, भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, सभापती सोनाली कोदे, रश्मी लुडबे, महेश जावकर, दीपक पाटकर, राजू परुळेकर, कृष्णनाथ तांडेल, राजन सरमळकर, धोंडी चिंदरकर, जेरॉन फर्नांडिस, संतोष साटविलकर, महेंद्र चव्हाण, बाबा परब, छोटू सावजी, रविकिरण तोरसकर, अशोक बागवे, राजू आंबेरकर, पूजा सरकारे, गणेश कुशे, प्रफुल्ल प्रभू, आशिष हडकर यांच्यासह स्वाभिमान व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राणेंचा अद्याप अधिकृत भाजप प्रवेश झालेला नसताना त्यापूर्वीच आजच्या मेळाव्यात स्वाभिमानचे पदाधिकारी भाजपच्या शाली परिधान करून भाजपवासी झाल्याचे दिसून आले.
श्री. देसाई म्हणाले, विरोधक युद्ध खेळून जिंकू शकत नाहीत हे सिद्ध झाले आहे. येत्या काळात कार्यकर्ते तळमळीने काम करतील. कुडाळ तालुका मताधिक्यात आघाडीवर असेल. देसाईच्या मागे दत्ता सामंत हाच चेहरा असेल. मतदार संघाची गेल्या पाच वर्षात दुर्दशा करण्याचे काम आमदारांनी केले. पर्यटन वाढीसाठी पाच वर्षात ठोस धोरण राबविले नाही. केवळ पाच वर्षात राणेंवर टीका करण्यातच त्यांनी धन्यता मानली.
श्री. सामंत म्हणाले, पालकमंत्री केसरकर, खासदार राऊत, वैभव नाईक यांनी माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी प्रयत्न केले. माझे शक्तिप्रदर्शन बघूनच ते हादरले. मात्र आता माझ्या रूपाने रणजित देसाई उभे आहेत. भाजपला प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. त्यामुळे आता शिवसेनेची मदत घेण्याची वेळ येणार नाही. येत्या काळात पालकमंत्री हा भाजपचाच असेल. जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच सर्व सत्तास्थाने ही भाजपचीच असतील असा दावा त्यांनी केला. भाजपात दोन महिन्यांपूर्वी प्रवेश दिला असता तर जिल्ह्यात शिवसेना दिसली नसती असा दावा त्यांनी केला. मी भाजपचा सदस्य झाला असून येत्या काळात सत्तेच्या माध्यमातून या भागाचा विकास करण्यास प्रयत्नशील राहणार आहे. अफवांना कार्यकर्त्यांनी बळी न पडता जोमाने काम करावे. उमेदवाराची निशाणी घरोघर पोचावी. विजय आपलाच आहे असे श्री. सामंत यांनी सांगितले.
सूत्रसंचालन राजू परुळेकर यांनी केले. प्रास्ताविक सुहास हडकर यांनी केले.

\