कुसूर येथील युवकाचा शांती नदीपात्रात मृतदेह आढळला…

119
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी ता.०९ :

मुंबई येथे हॉर्टिकल्चरचे शिक्षण घेत असलेल्या कुसूर-सुतारवाडी येथील युवकाचा मृतदेह परिसरातील नदीत आढळून आला.ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.तेजस प्रकाश नारकर वय २१ असे त्याचे नाव आहे.
तेजस याची तब्येत गेले काही दिवस बिघडली होती.त्यामुळे तो गावी आला होता.त्याच्यावर उपचार सुरू होते.आज सकाळी तो मॉर्निंग ओकला गेला,उशिरापर्यंत तो घरी नपरतल्याने घरातल्यांनी शोधाशोध केली.यावेळी कुसुर शांती नदी पात्रात त्याचा मृतदेह आढळून आला.
याबाबतची माहिती त्याचा भाऊ किरण याने भुईबावडा दूरक्षेत्रात दिली आहे.त्यानुसार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दीपक वरवडेकर अधिक तपास करत आहे.त्याच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ असा परिवार आहे.

\