आगीत भाजलेल्या शिरोडा येथील प्रशांत न्हावेवलकर यांचे आज निधन…

146
2
Google search engine
Google search engine
Google search engine

गोवा बांबुळी येथे उपचार सुरू दोन दिवसापूर्वी झाले होते पत्नीचे निधन…

वेंगुर्ले : ता.०९:
घराला लागलेल्या आगीत मदत कार्य करीत असताना गंभीर जखमी झालेल्या शिरोडा येथील प्रशांत न्हावेलकर यांचे आज गोवा-बांबूळी येथे उपचारादरम्यान आज निधन झाले.ही घटना आज सायंकाळी घडली.प्रशांत यांच्या पत्नीची दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते.तर त्यांचा मुलगा व मुलगी जखमी आहेत.त्यामुळे या संकटामुळे न्हावेलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
२ ऑक्टोबर रोजी न्हावेलकर यांच्या घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली होती. या आगीत सात जण जखमी झाले होते. तर घराचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
या आगीत प्रशांत व त्याची पत्नी प्रीत या जास्त प्रमाणात भाजल्या होत्या. या दोघांवर तात्काळ शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी बांबूळी येथे हलविण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी उपचार दरम्यान प्रशांत याची पत्नी प्रीत यांचा मृत्यू झाला. तर आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास प्रशांत याचाही मृत्यू झाला.
दरम्यान त्यांची ५ वर्षाची मुलगी मैथिली ही सुद्धा अजून बांबूळी येथे उपचार घेत आहे. तर ३ वर्षाचा मुलगा भार्गव याच्यावर उपचार करून त्याला कुटुंबीयांकडे देण्यात आले आहे. आगीच्या या दुर्घटनेमुळे या दोन्ही मुलांचे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

\