कायम गोड बोलून,पालकमंत्र्यांनी केला “विश्वासघात”…

2

राजन तेली:वाढदिवसादिवशी जाहीर केलेले सेट-टॉप,बॉक्स नोकऱ्या गेल्या कुठे…

सावंतवाडी ता,१०: आपण जिल्ह्यात कोट्यवधीचा निधी आणला असे वारंवार जाहीर करणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघातील बेरोजगार युवक-युवतींना नोकऱ्या देऊ असे सांगून वाढदिवसा दिवशी नोकऱ्यांचे गाजर दाखवले.सेट टॉप बॉक्स वितरीत करणार असे सांगितले होते मात्र ते नेमके गेले.कुठे असा प्रश्न भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केला.
निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना नोकऱ्यांचे आणि विकासाचे गाजर दाखवून केसरकरांनी नेहमीच त्यांचा विश्वासघात केला.त्यामुळे गोड बोलण्याचे दिवस संपले आता त्यांच्या अशा प्रकारच्या भूलथापांना कोणी बळी पडणार नाही.असे ते म्हणाले.कोलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात श्री.तेली बोलत होते.
ते म्हणाले पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नोकऱ्यांचे नियुक्ती पत्र देण्यात येईल,जिल्ह्यात एक लाख सेट-टॉप-बॉक्स देणार असल्याचे जाहीर केले होते.मात्र या दोन्ही पैकी एकही आश्वासन त्यांना पूर्ण करायला जमले नाही,केवळ गोड बोलून मतदारांना फसवायचे हा त्यांचा दिनक्रम सुरू आहे.परंतु आता मतदारांनी त्यांची नस ओळखली आहे.काही झाले तरी आता केसरकरांना त्यांची जागा जनताच दाखवेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले,तब्बल दहा वर्षे पालकमंत्री असताना दीपक केसरकर साध्या रस्त्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत,ते विकास काय करणार ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी तालुका अध्यक्ष महेश सारंग,नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,चंदन धुरी,संतोष राऊळ,अब्दुल साठी आदी उपस्थित होते.

1

4