वायंगणी प्राथमिक शाळा नं.२ येथे ‘ज्ञानसंपदा‘ ग्रंथालयाचे उद्घाटन…

2

बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम…

वेंगुर्ले ता.१०:

बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीचे अवचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे दत्तक गाव ‘वायंगणी-कांबळीवाडी‘ येथील प्राथमिक शाळा नं.२ येथे ‘ज्ञानसंपदा‘ ग्रंथालयाचे उद्घान करण्यात आले.
यावेळी वायंगणी सरपंच सुमन कामत, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.विवेक चव्हाण, प्रा.वसंत नंदगिरीकर, डॉ.धनश्री पाटील, ग्रामसेवक संदिप गवस, उपसरपंच आत्मराम उर्फ हर्षद साळगांवकर, शाळेचे शिक्षक तसेच विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योनजेचे स्वयंसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.नंदगिरीकर यांनी तर आभार प्रा.विवेक चव्हाण यांनी मानले.
आजचा युवक हा वाचन संस्कृतीपासून अलिप्त होत असताना या वर्गाला वाचनाकडे वळविण्यासाठी महाविद्यालय राबवित असलेला हा उपक्रम स्तुत्य असून यासाठी लागणारी मदत करण्याचे आश्वासन सरपंच कामत यांनी दिले. राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम हे समाजासाठी दिशादर्शक असून हे कार्य असेच चालू रहावे असे मुख्याध्यापक मांजरेकर यांनी सांगितले.

5

4