आरोग्य व रोजगाराचा प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार…

89
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बबन साळगावकर: गेल्या दहा वर्षात जिल्हा विकासात मागे राहिल्याची खंत…

सावंतवाडी.ता,१०: येथील विधानसभा मतदार संघाचा विकास आरोग्य व रस्त्याचा प्रश्न आदी महत्त्वाचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून मी मतदारांना सामोरे जाणार आहे.यासाठी येथील मतदार यादी माझ्या पाठीशी ठामपणे उभे रहावे असे आवाहन काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार बबन साळगावकर यांनी आज येथे केले.
दरम्यान दहा वर्ष मतदार संघात म्हणावा तसा विकास झालेला नाही.पालकमंत्री दीपक केसरकर यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे प्रशासन हल्ले नाही.परिणामी आपला जिल्हा विकासात मागे पडला आहे.असे त्यांनी सांगितले साळगावकर यांनी आज येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचेल सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी मी या विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उभा आहे.गेल्या काही वर्षात सावंतवाडी सह सिंदूर जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही.आरोग्य प्रश्न तसाच राहिला आहे.
याठिकाणी व्हेंटिलेटर ची सुविधा नाही.तर किरकोळ आजारासाठी गोवा बांबुळी सारख्या रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.याठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व दोन वर्षापूर्वी वेंगुर्ल्यात आधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.मात्र त्यानंतर काहीही झाले. नाही ही शोकांतिका आहे. रोजगाराच्या दृष्टीने याठिकाणी कोणत्याही हालचाली अथवा उपक्रम उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा फटका अनेक बेरोजगार युवक-युवतींना सहन करावा लागत आहे.नोकऱ्यांसाठी येथील युवकांना गोवा मुंबई पुणे आदी ठिकाणी जावे लागत आहे. ही सर्व परिस्थिती बदलणे गरजेचे आहे.त्यामुळे येथील जनतेने माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.असे आवाहन श्री साळगावकर यांनी केले.
यावेळी सुरेश गवस,उदय भोसले,सत्यजित धारणकर, अफरोज राजगुरू,अशोक पवार, संदीप नाईक,अभय पंडित,विजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

\