राजन तेली यांच्या प्रचारार्थ वेंगुर्लेत डिजिटल प्रचार रथ दाखल….

102
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मोठ्या मताधिक्याने तेली निवडून येणार : गोवहामंत्री तानावडे यांचा विश्वास….

वेंगुर्ले : ता.१०
सावनतवाडी विधान सभा मतदार संघाचे भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ दाखल झालेल्या डिजिटल प्रचार रथाचे उदघाटन श्रीफळ वाढवून भाजपचे गोवाप्रदेश महामंत्री सदानंद तानावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. तानावडे यांनी राजन तेली मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला. तर स्वाभिमान तालुकाध्यक्ष दादा कुबल यांनीही आम्ही सर्वजण तेली यांना विजयी करण्यासाठी कंबर कसली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वेंगुर्ले चे नगराध्यक्ष दिलीप गिरप, मतदार संघाचे विस्तारक पंकज बुटाला, भाजपा तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, स्वाभिमान तालुकाध्यक्ष दादा कुबल, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, जिल्हा सरचिटणीस साईप्रसाद नाईक, महिला शहर अध्यक्ष सुषमा खानोलकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, विजय बागकर, विद्याधर धानजी, गोव्याचे भाजप पदाधिकारी मधू परब, रघुनाथ परब, मिलिंद तळकर, सद्गुरू परास्तेकर, देवेंद्र गाड, प्रशांत नाईक, अक्षय मोरजकर तसेच संतोष शेटकर, सोमा मेस्त्री, योगेश प्रभु-खानोलकर, गोविंद मांजरेकर, संजय परब, रवींद्र शिरसाट, गणेश गावडे, हितेश धुरी, महेश कोनाडकर, राधाकृष्ण गोलतकर, पुरुषोत्तम कोचरेकर, रफिक शेख, नरेश नाईक, लक्ष्मी बिर्जे, स्नेहा घोगळे, रसिका मठकर यांच्यासह भाजपचे पादाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\