वैयक्तिक गाठीभेटीवर भर; विकासाच्या मुद्द्यावर सहकार्याचे केसरकरांचे आवाहन…
आंबोली ता.१०:
शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज आंबोली-चौकुळ परिसरात मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्याकडे भर दिला आहे.आपल्या पाठीशी जनता आहे,त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर मी पुन्हा एकदा निवडून येईन,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.गेल्या सावंतवाडी मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडवण्यास आपल्याला यश आले.त्यामुळे आता पुढील काळात येथील जनतेने आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,असे आवाहनही त्यांनी केले.
श्री.केसरकर यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आंबोली-चौकुळ भागाला भेट दिली.मोठ्या प्रमाणात पाऊस असतानासुद्धा श्री.केसरकर हे अनेक कार्यकर्त्यांना भेटले.यावेळी त्यांचा उत्साह लक्षात घेता उपस्थित ग्रामस्थांनी केसरकरांना आशीर्वाद दिले.