सावंतवाडी-भटवाडी येथे दुचाकी घसरून युवक गंभीर…

85
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१०: दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खडीवर कोसळल्यामुळे आंबेगाव येथील युवक गंभीर जखमी झाला आहे.ही घटना आज रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास भटवाडी-वेधशाळेत समोर घडली.यश कृष्णा जाधव (वय.३०) असे त्याचे नाव आहे.दरम्यान ठेकेदाराने निष्काळजीपणे रस्त्यावर खडी टाकल्यामुळे हा अपघात घडला.असा आरोप काँग्रेसचे युवक अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,जखमी दुचाकीस्वार आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन सावंतवाडी येथून आंबेगावच्या दिशेने जात होता.दरम्यान तो भटवाडी येथे आला,असता दुचाकीवरील ताबा सुटून हा अपघात घडला.या अपघातात त्याच्या तोंडाला,डोळ्याला,हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.तेथील स्थानिकांनी त्याला प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

\