जुन्या-नव्यांनी मेळ साधल्यास तेलींचा विजय निश्चित…

2

दयानंद सोपटे; चौफेर विकासासाठी भाजप सत्तेत असणे गरजेचे…

दोडामार्ग ता.१०:

जुन्यांनी-नव्या बरोबर आणि नव्यानी-जुन्या बरोबर योग्य मेळ साधल्यास भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांचा विजय दूर नाही,असा विश्वास गोव्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी आज येथे व्यक्त केला.गोव्यातील वाढत्या पर्यटनाचा फायदा दोडामार्ग तालुक्याला करून देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील महाराष्ट्र चौफेर विकास करण्यासाठी भाजप सत्तेत असणे गरजेचे आहे.त्यामुळे जिल्ह्यातील तीनही जागा विजयी होण्यासाठी प्रयत्न करा,असे आवाहन त्यांनी केले.
श्री.तेली यांच्या प्रचारासाठी आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी
भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, दयानंद सोपटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, प्रमोद कामत, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विजयकुमार मराठे, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, स्वाभिमान तालुकाध्यक्ष संतोष नानचे, आरोग्य सभापती अनिषा दळवी, उपसभापति लक्ष्मण नाईक, राजेंद्र निंबाळकर, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, संजय सातार्डेकर, दिपिका मयेकर व्यासपीठावर उपस्थित होते

 

7

4