मालवणात मुसळधार पाऊस…

83
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने सर्वत्र घबराट…

मालवण, ता. १० :

ढगांच्या गडगडाटासह आज रात्री अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला.
आज रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास वीजेचा लखलखाट, ढगांच्या गडगडाटासह अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. आज दिवसभर वातावरणातील उष्म्यात वाढ झाली होती. यात अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसून आले.

\