Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवलीत यंगस्टार मित्रमंडळाच्या जिल्‍हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन....

कणकवलीत यंगस्टार मित्रमंडळाच्या जिल्‍हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन….

 

कणकवली, ता.१८ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा चळवळीत यंगस्टार मित्रमंडळाचे योगदान मोठे आहे. हे मंडळ दरवर्षी कणकवलीत कबड्डी स्पर्धा आयोजित करत असते. यंगस्टार मित्रमंडळाच्या कबड्डी स्पर्धेतून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हे कबड्डीपटू खेळताना दिसतील, अशा विश्वास माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यांनी व्यक्त केला.

यंगस्टार मित्रमंडळाच्या जिल्‍हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन नगरपंचायतीच्या क्रीडा संकुलात झाले. माजी नगराध्यक्ष मेघा गांगण यांनी या स्पर्धेचा शुभारंभ केला. यावेळी माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे, मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, माजी नगरसेविका वैशाली आरोलकर, संजना सदडेकर, साक्षी वाळके, प्रियाली कोदे, भैय्या आळवे, संजय मालंडकर, रवी सावंत, भाजपच्या अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

मेघा गांगण म्‍हणाल्या की, यंगस्टार मित्रमंडळ सामाजिक उपक्रम व क्रीडा स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करीत असते. हे मंडळाचे हे उपक्रम कौतुकास्पद आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला कबड्डीपटूंसाठी मंडळाकडून जिल्हास्तरीत कबड्डी स्पर्धा आयोजित केली जात आहे. मंडळाचा हा क्रीडा विषयक उपक्रम स्तुत्य आहे,

सुप्रिया नलावडे यांनी यंगस्टार मंडळाच्या महिला कबड्डी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले. यावेळी कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments