शिरोडा येथील मराठी भक्तीगीत गायन स्पर्धेत निधी जोशी प्रथम

97
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता.११ 
रोटरी क्लब ऑफ शिरोडा व श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान,शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोडा येथे घेण्यात आलेल्या खुली मराठी भक्तीगीत गायन स्पर्धेत निधी जोशी हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
शिरोडा येथील या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेमध्ये निधी जोशी हिने प्रथम, वर्षा सावंत हिने द्वितीय तर गीता गवंडे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. तर अर्चना आपटे हिला उत्तेजनार्थ म्हणून जाहीर करण्यात आले. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेत परीक्षक म्हणून शेखर पणशीकर आणि शशिकांत निखार्गे यांनी काम पाहिले. दत्तराज कन्स्ट्रक्शन आरवली यांनी प्रायोजित केलेल्या या कार्यक्रमात हार्मोनियम साथ निलेश मेस्त्री व तबला साथ किशोर सावंत यांनी दिली.

\