मुलावर झालेला हल्ला तेली विसरले की काय..?

2

जयेंद्र परुळेकर: गोळीबार रक्तपाताची संस्कृती सावंतवाडीकर स्वीकारणार नाहीत

सावंतवाडी ता.११: राजन तेली आणि नारायण राणे यांची हातमिळवणी झाली याचा आनंद आहे.मात्र आपल्या मुलावर दादर रेल्वे स्टेशनवर झालेला हल्ला तेली विसरले की काय ? असा प्रश्न आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थित केला.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची शांत संस्कृती आहे.याठिकाण रक्तपात,गोळीबार,मारहाण अशा गोष्टींना येथील जनता खतपाणी घालणार नाही.त्यामुळे काही झाले तरी केसरकर पुन्हा एकदा निवडून येतीलच,असा विश्वास श्री.परुळेकर यांनी व्यक्त केला.
श्री.परुळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत घेतली यावेळी अनारोजीन लोबो,भारती मोरे,गजा नाटेकर आदी उपस्थित होते.यावेळी श्री परुळेकर म्हणाले काल सावंतवाडी आलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपण दीपक केसरकर यांचा पराभव करण्यासाठी तेलींना मदत करत आहेत.असे जाहीर केले मात्र या सर्व परिस्थिती काही वर्षांपूर्वीची घटना तेलींना आठवते का ? राजन तेली यांचे पुत्र प्रथमेश यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.त्यानंतर तेलींना प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.यात राणे कुटुंबीयांकडून आपल्या मुलाच्या जीविताला धोका आहे,असे त्यांनी म्हटले होते.मात्र आता ते दोघे एकत्र झाले आहेत.त्यामुळे त्यांच्या मुलाला आता धोका नाही का असा प्रश्‍न परुळेकर यांनी उपस्थित केला.तसेच ज्या राणेंनी त्यांच्या मुलावर हल्ला केला.तो हल्ला ते विसरले का ? असा प्रश्न परुळेकर यांनी केला. सावंतवाडी मतदार संघाची संस्कृती ही वेगळी आहे.याठिकाणी राडेबाजी,रक्तपात,मारहाण,गोळीबार अशा घटना चालत नाही त्यामुळे येथील जनता शांतताप्रिय असून पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास श्री. परुळेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
पालकमंत्री केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांचा निधी आणला परंतु केसरकरांनी त्याचे प्रमोशन केले नाही.त्यामुळे त्याचा उहापोह झाला नाही.परिणामी त्या निधीचे श्रेय विरोधकांकडून घेण्यात आले.

1

4