“मिस्टर-क्लीन”असलेल्या साळगावकरांच्यामागे येथील जनता राहील

84
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रवीण भोसले :शिवसेना-भाजपा तेढ निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादीला फायदा

सावंतवाडी ता.११: येथील विधानसभा मतदारसंघातील जनता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारी आहे,त्यांनी मला दोन वेळा निवडून दिले,त्यामुळे “मिस्टर क्लीन” म्हणून ओळख असलेल्या बबन साळगावकर यांच्या पाठीशी येथील जनता नक्कीच उभी राहील,असा विश्वास माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते प्रवीण भोसले यांनी आज येथे आयोजित राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात केली.याठिकाणी पराभवाची चिंता करू नका,समोरासमोर उभे असलेले युतीचे उमेदवार आपापसात भांडत असल्यामुळे साळगावकर यांचा विजय निश्चित आहे,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
येथील साळगावकर यांच्या पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस,उमेदवार बबन साळगावकर,एम.के.गावडे,उदय भोसले,अशोक पवार,नम्रता कुबल,पुंडलीक दळवी,दीपक नाईक,हरी कनयाळकर,आत्माराम ओटवणेकर,प्रसाद कविटकर,संजीव लिंगवत,ऑगस्तीन डीसोझा
आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री.सामंत म्हणाले,पक्षाची मागील दिवसाची काही परिस्थिती लक्षात घेता आता होणाऱ्या निवडणुका आमची अस्तित्वाची लढाई आहे.त्यामुळे येणाऱ्या या काळात येथील जनता नक्कीच आमच्या सोबत राहील,सत्ताधाऱ्यांच्या आश्वासने आणि आता भांडणाला लोक कंटाळले आहेत.त्यामुळे कोणताही आरोप असलेल्या साळगावकर यांच्या पाठीशी येथील जनता ठामपणे उभे राहील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

\