रत्नागिरी येथे सैन्य भरतीचे आयोजन…

93
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधदुर्गनगरी ता.११: सेना भर्ती कार्यालय कोल्हापूर यांच्यावतीने १७ ते २७ नोव्हेंबर या काळात शिवाजी स्पोर्ट्स स्टेडियम,मारुती मंदीर सर्कल, रत्नागिरी येथे सैन्य भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती सिंधुदुर्ग, रत्नागिरी व गोवा राज्यातील दोन जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आहे. सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर क्लार्क, स्टोअर किपर टेक्नीकल, सोल्जर टेक्नीकल, सोल्जर फार्मा, सोल्जर नर्सिंग असिस्टंट ॲन्ड नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी व सोल्जर ट्रेड्समन या पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.
भरतीसाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. भरती स्थळी रॅलीमध्ये फक्त ॲडमिट कार्ड असलेल्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जाईल, उमेदवारांनी त्यांच्या ॲडमिट कार्डवर नमुद केलेल्या दिवशी व वेळी शिवाजी स्पोर्ट्स स्टेडियम, मारुती मंदिर सर्कल, रत्नागिरी येथे हजर रहावे.
भरतीसाठी शारिरीक पात्रता, आवश्यक कागदपत्रे व इतर महत्वाच्या माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा, सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
दलालांपासून सावधान
भारतीय सैन्यामध्ये होणारी भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक आहे. त्यामध्ये कोणत्याही स्तरावर पैशांची देवाण – घेवाण होत नाही. भारतीय सैन्यमध्ये भरती होण्यासाठी कोणत्याही दलालांची आवश्यकता नाही. दलाल किंवा कोणत्याही मध्यस्थ व्यक्ती कोणत्याही उमेदवाराला सैन्यामध्ये भरती करु शकत नाही. जर अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती किंवा दलाल सैन्य भरतीसाठी पैसे किंवा इतर वस्तुंची मागणी करीत असेल तर नजीकच्या पोलीस स्टेशनकडे तक्रार द्यावी असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र.771
जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत नियमन आदेश जारी
सिंधदुर्गनगरी, (जिमाका) दि. 11 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान व 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होत आहे. सध्या जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांकडून आप-आपल्या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. विधानसभा निवडणूक 2019 च्या कालावधीत कोणताही अनुचीत प्रकार, घटना घडू नयेत व निवडणुका शांततेत, सुरळीत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडाव्यात, तसेच समाजात शांतता व परस्पर सामंजस्यांची भावना वाढील लागून एकात्मता आबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारान्वये जिल्ह्यात 26 ऑक्टोबर 2019 रोजीपर्यंत नियमन आदेश जारी करण्यात केले आहेत.

\