Tuesday, May 20, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामालवण-नांगरभाट येथील श्री भवानी मंदिरात ६ मे ला पांजी महोत्सव...

मालवण-नांगरभाट येथील श्री भवानी मंदिरात ६ मे ला पांजी महोत्सव…

मालवण, ता. २३  तालुक्यातील नांगरभाट येथील श्री भवानी मंदिरात क्षत्रिय गडकरी मराठा पोफळे परिवार, मुंबई यांच्या वतीने पांजी महोत्सव ६ मेला साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याय आले आहे

यानिमित्त ४ मे ला सायंकाळी ५ वाजत लोपाचार, ६ मे ला सकाळी ८ वाजता देवीला पाचारण करण्यासाठी हाक दिली जाईल, यावेळी सर्व पोफळे भावकी परिवार उपस्थितीत पुढील कार्यक्रम देवीच्या आज्ञा ने पार पडतील. दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता महिलासाठी हळदीकुंकू समारंभ सायंकाळी ७ वाजता हरिपाठ व महाआरती, रात्री १० स्थानिक सुस्वर भजन सादर होणार आहे. ९ मे ला सकाळी ८ वाजता पुजायुक्त ब्राह्मण भोजन आदी कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवास उपस्थित राहावे, अधिक माहितीसाठी प्रकाश पोफळे ८३६९८०७५१६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोफळे भवानी मंदिर कार्यकारी मंडळातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments