जिल्ह्यात “रामराज्य” आणण्यासाठी माझे प्रयत्न

86
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर: तेली की केसरकर ? हे तुम्हीच ठरवा…

दोडामार्ग/महेश लोंढे.ता,११: बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या आदर्श नुसार भविष्यात जिल्ह्यात रामराज्य आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. येथील बेरोजगारांचे व आरोग्याचे प्रश्न सुटावेत यासाठी मी प्रयत्नशील आहे त्यामुळे नेमका कोणता आमदार पाहिजे हे तुम्ही ठरवा असे भावनिक आवाहन शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केले.
मी गृहराज्यमंत्री असताना जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात एकही राडा झाला नाही.चिखलफेक करणार्‍या आमदाराला तीन दिवस जेलमध्ये वडापाव खायला लावला ही माझी ताकद आहे.त्यामुळे भविष्यात रावणाची दहातोंडे संपवण्यासाठी शिवसेनेसोबत रहा असेही केसरकर म्हणाले.
कुंब्रल येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात श्री केसरकर बोलत होते.
यावेळी सभापती संजना कोरगावकर धनश्री गवस संपदा देसाई गणेश प्रसाद गवस केशव धाऊसकर दयानंद धाऊसकर विजय जाधव गणपत नाईक संजय नाईक प्रवीण परब आदी उपस्थित होते.यावेळी केसरकर म्हणाले जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने मी गेली.अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. येथील रोजगाराचा प्रश्न सुटावा नोकरीचा प्रश्न सुटावा आरोग्य यंत्रणा बळकट व्हावी या दिवशी मी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे.
या निवडणुकीत विकासावर बोलण्यात कोणा रस नाही. एकमेकांवर टीका टिपण्णी केली जात आहे हा सर्व प्रकार चुकीचा आहे.येणाऱ्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून आपण प्रयत्न करणार आहे.

\