शिवसेनेत दाखल झालेले आमडोस ग्रामस्थ पुन्हा भाजपात…

83
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभव नाईकांच्या कुटनीतीला कंटाळल्याचा आरोप; दत्ता सामंतांनी केले स्वागत…

कुडाळ ता.११:

दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज कूटनीती वापरून बाद करणाऱ्या आमदार वैभव नाईकांवर नाराज होऊन आमडोस-व्हाळवाडी आणि कदमवाडी ग्रामस्थांनी विष्णू परब आणि शशी नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला.अलीकडेच त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला होता.दरम्यान नाईक यांनी रचलेल्या यंत्राला कंटाळूनच आम्ही शिवसेनेतून काढता पाय घेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.दत्ता सामंत यांनी प्रवेशकर्त्या ग्रामस्थांचे स्वागत केले.

आंबडोस ग्रामस्थांनी मागील आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला होता. गेली अनेक वर्षे स्वाभिमानकडे असणारा हा गाव शिवसेनेत गेल्याने स्वाभिमानला देखील धक्का बसला. मात्र या मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या स्वाभिमान जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज आमदार वैभव नाईक यांनी षडयंत्र करून बाद केल्याने येथील ग्रामस्थ नाराज झाले होते. शिवसेनेच्या या षडयंत्राचा निषेध म्हणून आंबडोस व्हाळवाडी आणि कदमवाडी येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप मध्ये प्रवेश केला. यामध्ये विष्णू परब, भरत परब, धर्मेंद्र साळगावकर, निलेश चव्हाण, सतीश दळवी, राजू दळवी, सुभाष परब, विश्वनाथ करावडे, विजय करावडे, एकनाथ साळगावकर, विष्णू साळगावकर, महेश शेलार, सूर्यकांत साळगावकर, ग्रामपंचायत सदस्य संजय इंदुलकर, विजया साळगावकर, संजय कदम, आत्माराम कदम, प्रकाश कदम, अक्षय कदम, शैलेश कदम, संतोष इंदुलकर, सिद्धेश पोळ, अनिकेत घाडी, दीपक करावडे यांसह अन्य ग्रामस्थांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी राजा गावडे, सुधीर वस्त, धोंडी नाईक, प्रशांत नाईक, सरपंच सौ. वराडकर, मंदार लुडबे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

\