दीपक केसरकर; अपक्ष म्हणून उभे असलेले राजन तेली “फ्राॅड”…
सावंतवाडी ता.१२:
शिवसेने बद्दल असलेली कटुता नारायण राणे यांनी संपवावी,ही माझी भूमिका होती.तसा निर्णय त्यांनी घेतल्यास ते नक्कीच सुधरतील,परंतू कटुता निर्माण करण्यासारखी राणेंनी केलेली वक्तव्ये तपासून पाहिली पाहीजेत,असा टोला पालकमंत्री तथा शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद लगावला.दरम्यान भाजप पुरस्कृत म्हणून उभे असलेल्या राजन तेलींवर कारवाई करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत,असे असताना ते निवडणूक लढवित आहेत,ते फ्राॅड आहेत,असा ही आरोप यावेळी त्यांनी केला.ज्या नितेश राणेंनी मोदींचे व्यंगचित्र काढले होते.तसेच शिवसेना प्रमुखांवर टीका करणा-या लोकांना जनता स्विकारणार नाही,असा ही आरोप त्यांनी केला.आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी संदेश पारकर,जयेंद्र परूळेकर आदी उपस्थित होते.