मालवण, ता. २८: वायरी येथील २८ वर्षीय तरुण महेश प्रमोद मातोंडकर याच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्या उपचारासाठी १५ लाख रुपयांची आवश्यकता असून गरीब कुटुंबाला मदतीची गरज आहे.
वायरी भूतनाथ येथील माणगावकर काजू फॅक्टरीजवळ राहणारे प्रमोद मातोंडकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या वर्षी त्यांच्या पत्नी प्रियांका यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. या दुःखातून कुटुंब सावरत नाही तोच, त्यांचा मोठा मुलगा महेश याला ब्रेनस्ट्रोक आला आहे. नुकताच विवाह झालेला महेश मुंबईत काम करतो. बाथरूममध्ये पडल्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो सध्या बेशुद्ध असून डॉक्टरांनी त्याच्या उपचारासाठी १५ लाख रुपये खर्च सांगितला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असली तरी प्रकृतीत सुधारणा झालेली नाही.
मातोंडकर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे महेशच्या उपचारासाठी लागणारा मोठा खर्च त्यांना परवडणारा नाही. यामुळे मातोंडकर कुटुंबीयांनी आणि मातृत्व आधार फाऊंडेशनने दानशूर व्यक्ती तसेच सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे.
दानशूरांनी खालील बँक खात्यावर आपली मदत जमा करू शकतात: बँक: सिंधुदुर्ग जिल्हा बँक, शाखा तारकर्ली, ता. मालवण,
खाते क्रमांक: ०६१४०००००००५२३७
आयएफएस कोड: SIDC०००१०६१ संपर्क: ९४०४३९६१८२
या कठीण परिस्थितीत महेश आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावून त्यांचे दुःख कमी करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.