Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याराजभाषा स्पर्धा परीक्षेत कट्टा येथील वराडकर हायस्कूलचे यश...

राजभाषा स्पर्धा परीक्षेत कट्टा येथील वराडकर हायस्कूलचे यश…

मालवण, ता. ३० : अखिल भारतीय राजभाषा हिंदी प्रचार संस्थेच्या वतीने घेण्यात येणारी राजभाषा स्पर्धा परीक्षेत कट्टा केंद्रातून प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले.

यामध्ये सिद्धी दशरथ गुराम ५ वी, स्वराली विनय ताम्हणकर ९ वी, भगवान मोहन पवार १२ वी या विद्यार्थ्यांनी विशेष पुरस्कार सह सुवर्ण पदक मिळवून यश संपादन केले आहे. याच बरोबर गतवर्षी वेदा प्रवीण मराठे ५ वी, प्राची शंकर चव्हाण १० वी तर नीलाक्षी शंकर चव्हाण १२ वी हे विद्यार्थी राष्ट्रीय राजभाषा हिंदी रत्न पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.

एकूण २८ राज्यातून ही परीक्षा घेतली जाते व राष्ट्रीय स्तरावरील ही परीक्षा असून विशेष पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे तसेच विद्यालयातून प्रविष्ठ झालेल्या १५८ विद्यार्थी व आदर्श पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका देवयानी गावडे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हिंदी प्रमुख बाळकृष्ण वाजंत्री, भूषण गावडे, श्रीमती ज्योती मालवदे, छाया कानुरकर, रितेश जांभवडेकर यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संस्थेचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, खजिनदार श्याम पावसकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, सहसचिव साबाजी गावडे, संचालक शिवराम गुराम, श्रुती वराडकर, स्वाती वराडकर, महेश वाईरकर सल्लागार डॉ. व्हि.सी.वराडकर, सुहास वराडकर, प्रभाकर वाईरकर, नारायण पेणकर, व्हिक्टर डान्टस, संतोष साटविलकर, ॲड ऋषी देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments