Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभंडारी महाविद्यालयाच्या पाककला स्पर्धेत मनीषा बनसोडे प्रथम...

भंडारी महाविद्यालयाच्या पाककला स्पर्धेत मनीषा बनसोडे प्रथम…

मालवण, ता. ३० : भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित भंडारी कनिष्ठ महाविद्यालय मालवणच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आजी माजी विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत मनीषा भीमराव बनसोडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक कृतिका दिवाकर भिसळे यांनी व तृतीय क्रमांक हिना वसंत धुरी यांनी मिळविला.

या स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून मिलन अनिल लाड व शीतल मयेकर (गावकर) यांची निवड करण्यात आली. तर आगळी वेगळी संकल्पना – अमृता उत्तम चव्हाण व उत्कृष्ट सजावट – वैदेही मधुसूदन सारंग यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण संजय गावडे, ममता वराडकर, वैभव तोंडवळकर यांनी केले. या विजेत्यांना ४ मे रोजी सकाळी १० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणाऱ्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालय सुवर्णमहोत्सव सोहळ्यात पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments