राणेंना गुंड म्हणणारे प्रमोद जठार आता त्यांच्याच ताटाखालचे मांजर झाले…

121
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संजय पडतें :शिवसेनेचे तिन्ही उमेदवार निवडून येतील ही काळया दगडावरची रेघ…

वेंगुर्ले : ता.१२
शिवसेनेला मेंढराची उपमा देणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे नारायण राणेंच्या ताटाखालचे मांजर झाल्याची खरमरीत टीका शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेत केली.
काल जठार यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्याचा पडते यांनी समाचार घेतला. जठार ह्यांनी नाणार हातात घेतला त्यामुळे ते शिवसेनेवर बेताल वक्त्यव्य करीत आहेत. मात्र ते शिवसेने मुळेच आमदार झाले होते याची जाणीव त्यांनी ठेवावी.
नितेश राणे यांची प्रवृत्ती गुंडगिरीची आहे असे सांगणारे जठार आता त्याचेच गुणगान गात आहेत. त्यामुळे त्यांना जनता मतदानातून उत्तर देईल असेही पडते म्हणाले.
१५ तारीख ला स्वाभिमान भाजप मध्ये विलीन झाल्यावर समजेल की शिवसेनेच्या मागे जिल्ह्यातील जनता किती आहे ते.दीपक केसरकर यांनी अनेक ठिकाणी केली चांगली कामे केली असून भरघोस निधी विकासासाठी आणला. त्यामुळे त्यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे तिन्ही उमेदवार विजयी होतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असाहि विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या सोबत तालुकाप्रमुख यशवंत परब, सभापती सुनील मोरजकर, आबा कोंडसकर बाळा दळवी, प्रकाश गडेकर, अतुल बंगे, रमण वायगणकर, सचिन वालावलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

गुंडप्रवृत्ती म्हणून हीणवणाऱ्या नितेश राणे यांनाच आपल्या पक्षात घेऊन तिकीट दिले, ज्यांनी शिवसेना संपवणार असे जाहीर केले त्यांना का म्हणून साथ द्यायची,अन्य कुठचाही उमेदवार असला असता तर शिवसेनेचा त्याला जाहीर पाठिंबा असता असेही त्यांनी सांगितले. तसेच राणेंना पाडण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले

\