Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्गात आता सर्व शासकीय कार्यालयात "ए.आय" तंत्रज्ञान वापरले जाणार...

सिंधुदुर्गात आता सर्व शासकीय कार्यालयात “ए.आय” तंत्रज्ञान वापरले जाणार…

उद्या पालकमंत्री यांच्या उपस्थितीत घोषणा; जिल्ह्यात महाराष्ट्र दिनी विविध कार्यक्रम…

 

सिंधुदुर्गनगरी,ता.३०: जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात “ए आय” तंत्रज्ञाचा वापर सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाची घोषणा करण्यात येणार आहे. यासाठी पालकमंत्री श्री. राणे उद्या पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. श्री. राणे हे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने उद्या सिंधुदुर्गात आहेत.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:- सकाळी ७.३० वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली, येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण, सकाळी ८ वाजता महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणास उपस्थिती, सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या उद्घाटनास उपस्थिती, सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम बुध्दिमत्ता ए.आय तंत्रज्ञानाचा वापर सुरु करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्घाटनास उपस्थिती, दुपारी २ वाजता शशिकांत राणे, मु.पो.हळवल,ता. कणकवली यांच्या कन्येच्या विवाहास उपस्थिती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments