राणे आल्यामुळे भाजपला सुज आली,मात्र ती…. लवकरच उतरेल….

167
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संदेश पारकर; खरे बंडखोर तेली आणि जठार,त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार…

सावंतवाडी ता.१२:

नारायण राणे भाजपमध्ये आल्यामुळे भाजपला सूज आली आहे.ही सूज लवकरच उतरेल.मात्र त्यावेळी प्रमोद जठार यांचे जिल्ह्यात राजकीय भांडवल सुध्दा उरणार नाही,अशी टीका युवा नेते संदेश पारकर यांनी आज येथे केली.राजन तेली व जठार हे दोघेही भाजपात खऱ्या अर्थाने बंडखोरी गाजवत आहेत.त्यांच्यावरच पक्षाने योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी आपण भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी करणार आहे.माझे भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी कोणतेही हेवेदावे नाहीत.असेही त्यांनी सांगितले.सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी आज येथे पालकमंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी उपस्थित असलेल्या श्री.पारकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी दीपक केसरकर,माजी उपनगराध्यक्ष उमा वारंग,अशोक दळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
ते म्हणाले,आज भाजपाने राणेंना ताकद देऊन ज्या दहशतवादाला येथील जनतेने मुठमाती दिली होती,तो पुन्हा माजवण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र येथील जनता सुज्ञ असून पुन्हा दहशतवादाला येथे थारा देणार नाही.राजन तेली हे अपक्ष आमदार असतानाही ते भाजप पुरस्कृत असल्याचे सांगून बंडखोरी वाढवण्याचे काम करत आहेत.त्यामुळे इथल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आमचा राग असून वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी आमचा कोणताही वाद नाही.असे त्यांनी स्पष्ट केले.
राजन तेली हे धंदेवाईक पुढारी व राणे समर्थक आहेत.लोकसभेत त्यांनी शिवसेना-भाजप युतीचे काम केले नाही.तसेच आज तिन्ही मतदारसंघात उभे असलेले उमेदवार हे नारायण राणे समर्थक असून सुज्ञ जनता यांना जागा दाखवतील व महायुतीचे अधिकृत उमेदवार तब्बल ४० हजाराच्या मताधिक्याने निवडून येतील,असा विश्वास श्री.पारकर यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले,नारायण राणे भाजप ला सोडून गेल्यावर जठार यांचे असलेले राजकीय भांडवल सुद्धा जिल्ह्यात उरणार नाही,राणे यांना ज्या-ज्या पक्षाने मोठं केलं त्या-त्या पक्षाची विमाने त्यांनी केली.त्यामुळे राणे काहीच चीज आहे.हे भाजपला येणाऱ्या काळात कळून चुकेल.आज राणेंनी कितीही बढाया मारल्या तरी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही शिवसेनेचे आमदार निवडून येणार हे सत्य असून जनता नारायण राणे यांना त्यांची जागा दाखवून देणार असे श्री.पारकर म्हणाले.

\