अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी अलिबाग मधील १९ पर्यटक ताब्यात…

135
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा-तपासणी नाक्यावर कारवाई;१३ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त…

बांदा ता.१२:

गोव्याहुन अलिबागकडे जाणार्‍या एका खासगी आराम बसमधून होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीस तपासणी नाक्यावर स्थीर निरीक्षण पथकाने आज (एसएसटी) कारवाई केली.गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या उरण (ता. अलिबाग) मधील तब्बल १७ प्रवाशांसह बसचालक व क्लीनरवर कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत १ लाख ६५ हजार ४११ रुपयांच्या दारुसह एकूण १३ लाख ६५ हजार ४११ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी चालक राजेंद्र सत्यवान कवडे (४५, सातारा), क्लिनर शैलेश हरिश्चंद्र सुर्वे (रा. हडी मालवण), मनीष काशीनाथ पाटील (४३), संतोष चंद्रकांत पाटील (३२), मनोज जगन्नाथ पाटील (२९), विशाल वासुदेव ठाकूर (३३), राजेंद्र सुभाष ठाकूर (३३), संजय रमेश ठाकूर (३९), रोशन अरविंद जाधव (३०), कुणाल मधुकर भोईर (२९), दिनेश तुकाराम पाटील (३०), रतीश अर्जुन पाटील (२८), रोमेश भारत ठाकूर (३४), नरेश शिवराम म्हात्रे (६४), प्रणय बिपीन ठाकुर (२६), यज्ञेश गणेश भोईर (२६), समीर चंद्रकांत ठाकूर (२७), कल्पेश सुभाष ठाकूर (३०), अभिजीत देवानंद ठाकूर (२६, सर्व रा. भंडखळ, ता. उरण) यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाईत गोवा बनावटीच्या दारुचे ३४ विविध उंची ब्रँड होते.

\