राजन तेलींच्या प्रचारात महेश सारंग,संजू परब एकत्र…

92
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रचाराचा फोडला नारळ; आता विजय निश्चित कार्यकर्त्यांना विश्वास…

सावंतवाडी ता.१२: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपच्या पदाधिका-यांनी एकत्र येत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांच्या शहर प्रचाराचा नारळ आज फोडला.यावेळी श्री देव पाटेकर मंदिरात जावून सर्व पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले.विशेष म्हणजे गेले काही दिवस एकमेकांपासून दूर असलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब व भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग असे दोघेही डावे-उजवे एकत्र आल्यामुळे आता तेली यांच्या प्रचारात रंगत येणार आहे.दरम्यान दोन्ही एकत्र झाल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.असा दावा तेली समर्थकांकडून करण्यात येत आहे.
भाजपचे पुरस्कृत उमेदवार श्री तेली यांचा सावंतवाडी प्रचाराला सुरुवात करण्यात आली.यावेळी स्वाभिमान शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगांवकर, भाजप शहराध्यक्ष प्रसाद आरविंदेकर, गटनेते राजू बेग, उदय नाईक, बाळ पुराणीक, मनोज नाईक, केतन आजगांवकर, नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर, संतोष गांवस, सचिन साटेलकर, राघू चितारी, नगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगांवकर, उमेश कोरगांवकर, नगरसेविका सम्रुद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर, सौ. यादव, सौ. टोपले, गुरू मठकर, शुभदा सावंत, प्राजक्ता मुद्राळे आदींसह शहरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

\