मुलावर हल्ला करणा-यांचीच मदत घेण्याची वेळ येणे हे दुदैव….

94
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बाहेरच्या उमेदवाराला या ठीकाणी थारा नको; केसरकरांची तेलींवर टीका…

दोडामार्ग ता.१२:
राजकारणात यशस्वी होण्यासाठी जो माणूस आपल्या पोटच्या मुलावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीची मदत घेतो,त्याची नैतिकता काय याबाबत न बोललेलेच बरं,अशी टीका शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी अपक्ष उमेदवार राजन तेली यांचे नाव न घेता आज येथे केली.जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी आपण तेराशे मुलांना या ठिकाणी विविध कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणार आहे.त्याचा येथील युवकांनी फायदा घ्यावा कोणाच्याही आश्वासनाला बळी पडून बाहेरच्या उमेदवाराला थारा देवू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.केसरकर यांनी आज शिरंगे गावात प्रचार सभा घेतली.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्य दीक्षा गवस यांनीं आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी श्री.केसरकर यांनी तेलींवर तोफ डागली.राजकारणात यशस्वी होण्यासाठी जो माणूस आपल्या मुलावरचा हल्ला करणाऱ्या व्यक्तीची मदत घेतो,त्याची नैतिकता काय याबाबत न बोललेलेच बरे,असे त्यांनी सांगितले.बाहेरून या ठिकाणी आलेल्या उमेदवारांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत थारा देऊ नका,आपण गेल्या अनेक वर्षात कोट्यावधी रुपयाचा निधी सावंतवाडी मतदारसंघासह जिल्ह्यासाठी दिला आहे.येणाऱ्या काळात विकासाची गंगा आणू असा विश्वास यावेळी केसरकर यांनी व्यक्त केला.

\