कुडाळ-बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने प्लास्टिक पिक-अप डे” साजरा…

2

कुडाळ ता.१३: बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त केंद्र सरकारच्या स्वच्छता सेवा अभियानांतर्गत “प्लास्टिक पिक-अप डे” निमित्त येथील रेल्वे स्थानक परिसरात विविध उपक्रम राबविण्यात आले.
महात्मा गांधी यांचं २०१९ हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष यानिमित्ताने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या पुढाकाराने संपूर्ण देशाला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांचे व कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून त्याचाच एक भाग म्हणजे महात्मा गांधी यांची जयंती” प्लास्टिक पिक अप डे” म्हणून यावर्षी स्वच्छता उपक्रमाने आयोजित करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. त्याप्रमाणे बॅरिस्टर नाथ शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅरिस्टर नाथ पै शैक्षणिक भवनात महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती विविध प्रार्थना व मान्यवरांच्या मनोगताने साजरी केल्यानंतर कुडाळ रेल्वे स्थानकाच्या परिसरातील प्लास्टिक उचला मोहीम राबवून बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमाच्या सुमारे अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिक अप डे साजरा केला आणि कुडाळ रेल्वे स्थानकाचा परिसर टाकाऊ प्लास्टिक पासून मुक्त करण्यात आला. यावेळी बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालय, बॅरिस्टर नाथ नर्सिंग महाविद्यालय, बॅरिस्टर नाथ पै महिला बी. एड .कॉलेज, बॅरिस्टर नाथ पै रात्र महाविद्यालय ,बॅरिस्टर नाथ पै जुनिअर कॉलेज ,बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल चे विद्यार्थी ,शिक्षक, प्राचार्य मोठ्या संख्येने या अभियानामध्ये सहभागी झाले होते. संस्था व्यवस्थापकीय अधिकारी डॉक्टर व्यंकटेश भंडारी यांच्या व्यवस्थापनाखाली प्लास्टिक पिक अप डे मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली .बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमा बद्दल कुडाळ रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर श्री सामंत ,कोकण रेल्वे एम्प्लाॅइज युनियनचे पदाधिकारी, ग्रामस्थ ,व प्रवासी यांनी याबद्दल सर्व विद्यार्थी,शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.
तत्पूर्वी शिक्षणसंस्थेमध्ये म.गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमांना डॉ.व्यंकटेश भंडारी यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या जयंती निमित्त मनोगत व्यक्त करताना प्र.प्राचार्य अरुण मर्गज म्हणालेशांती,सत्य,अहिंसा आणि सत्याग्रह यांचा त्रिवेणी संगम असलेला, प्रचंड आत्मविश्वास व बलदंड सामर्थ्य असलेला महानायक म्हणजे महात्मा गांधी होय. खेड्यापाड्यात वसलेल्या भारतासारख्या देशाचा विकास व्हायचा असेल तर खेड्यांचा विकास, स्वच्छतेची कास धरल्याशिवाय आणि ग्रामोद्योग यांना प्रोत्साहन दिल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही .हे ओळखून खेड्याकडे चला हा संदेश देणारे महात्मा गांधी हे एक युगपुरुष होते.असे सांगत लालबहादूर शास्त्री यांच्या मूर्ती लहान पण कीर्ती महान या उत्तुंग चारित्र्याचा थोडक्यात परिचय करून देत “जय जवान जय किसान ‘या त्यांच्या घोषणेचा ही उपस्थितांचा परिचय करून दिला व दोघांना आदरांजली अर्पण करण्यात आली

6

4