सावंतवाडी,ता.०७: गोवा बनावटीची दारू बाळगल्या प्रकरणी मळेवाड येथील एका महिलेवर कारवाई करण्यात आली. तिच्याकडून ३२ हजार रुपयाची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी पोलिसांकडून करण्यात आली. श्वेता विजेंद्र उर्फ हेमा श्रीधर रेडकर (वय ४०, मळेवाड- मूरकरवाडी) असे तिचे नाव आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती ही गोवा बनावटीची दारू विकत असल्याची माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता रेडकर हिच्याकडे ३२ हजार रुपयाची दारू आढळून आली. याप्रकरणी रेडकर हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.