Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभुईबावडा-रिंगेवाडी येथील नूतन गणेश मंदिराचे उद्घाटन, नितेश राणेंनी घेतले दर्शन...

भुईबावडा-रिंगेवाडी येथील नूतन गणेश मंदिराचे उद्घाटन, नितेश राणेंनी घेतले दर्शन…

वैभववाडी,ता.०९ : भुईबावडा- रिंगेवाडी येथील श्री गणेश मंदिर वास्तु उद्घाटन आणि श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. रिंगेवाडी ग्रामस्थ मंडळ व रिंगेवाडी सेवा मंडळ मुंबई यांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या मंदिराचे उद्घाटन सखाराम देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, भाजपा पदाधिकारी भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, बंड्या मांजरेकर, प्राची तावडे, राजेंद्र राणे, देवानंद पालांडे, भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे, संताजी रावराणे, देसाई गुरुजी, मंडळाचे अध्यक्ष दीपक माने, सचिव सुरेश मोरे, खजिनदार विश्वनाथ देसाई, संदीप मोरे, प्राची मोरे व पदाधिकारी उपस्थित होते. भुईबावडा गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. पुढील विकास कामांची जबाबदारी देखील माझी राहील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments