Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअल्पवयीन मुलीवर अत्याचार, कणकवलीतील एकाची निर्दोष मुक्तता...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कणकवलीतील एकाची निर्दोष मुक्तता…

कणकवली, ता. १०: अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शिरवल- कणकवली येथील मयूर सखाराम कासले याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड. प्राजक्ता शिंदे, ॲड. कौस्तुभ मर्गज यांनी काम पाहिले.

याबाबतची अधिक माहीती अशी की, संबंधित पिडीत अल्पवयीन मुलगी ही कॉलेजला जात असताना संबंधित संशयित कासले याने तिला फुस लावून पळवून नेले होते. तसेच तिच्यावर अत्याचार केले होते. याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments