हडी ज्येष्ठ नागरीक संघाच्या वतीने नेत्र चिकित्सा शिबिर…

94
2
Google search engine
Google search engine
Google search engine

६५ जणांनी घेतला लाभ…

मालवण, ता. १३ :

निरोगी शरीर ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. गावातील ज्येष्ठ नागरीकां बरोबरच इतरांच्या सुद्धा आरोग्याची काळजी घेण्यासाठी ज्येष्ठ नागरीक संघाच्या माध्यमातुन आरोग्य शिबिराच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. सर्व ज्येष्ठांचे आरोग्य चांगेल रहावे यासाठी राबविलेला आरोग्य शिबीराचा उपक्रम स्तुत्य असाच आहे. यापुढेही अशाच प्रकारचे आरोग्याशी संबधित उपक्रम संघाच्या माध्यमातुन राबविले जातील असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षा श्रीमती चंद्रकला कावले यांनी हडी येथे केले.
फेस्कॉन संलग्न ज्येष्ठ नागरीक सेवा संघ हडी व नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय, कणकवली यांच्या सयुक्त विद्यमाने मशिनद्वारे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन हडी जठारवाडी येथे करण्यात आले होते. या शिबीरामध्ये ६५ जणांनी नेत्र तपासणी केली. २० रुग्णांना अल्प खर्चात चष्मा वाटप तर ७ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबीराचे उद्घाटन संघाचे माजी अध्यक्ष साबाजी हडकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. केवळ ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम न राबविता गावातील सर्वच ग्रामस्थांसाठी विविध उपक्रम राबविणारा हडीचा ज्येष्ठ नागरीक संघ जिल्ह्यात ऐकमेव आहे असे माजी अध्यक्ष साबाजी हडकर यांनी सांगितले.
यावेळी नेत्रतज्ज्ञ संदीप कदम, सिद्धेश घारे, पोलिस पाटील सौ. शितल परब, माजी पोलिस पाटील जानू कदम, संघाचे उपाध्यक्ष रमेश कावले, माजी सचिव चंद्रकांत पाटकर, सचिव प्रभाकर चिंदरकर, उपसचिव प्रभाकर तोंडवळकर, नवनाथ गोलतकर, सदस्य सौ. मंजिरी पेडणेकर, सौ. अपर्णा साळकर, गितांजली मयेकर, वैशाली पाटकर, गणेश परब, मोहन घाडीगावकर, शंकर पाटील, शांताराम साळकर, गणू परब, मुख्याध्यापिका सौ. श्रुती गोगटे, सौ. सोनाली कदम, प्रतिभा कदम तसेच ज्येष्ठ नागरीक संघाचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन चद्रकांत पाटकर यांनी केले. प्रभाकर तोंडवळकर यांनी आभार मानले.

\