सिंधुदुर्गनगरी,ता.१०: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या ता. ११ मे ला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
उद्या सकाळी ११.४५ वाजता चिपी विमानतळ येथे आगमन होणार व हेलिकॉप्टरने मालवणकडे प्रयाण, दुपारी १२.१५ वाजता, टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड हेलिपॅड, मालवण येथे आगमन व मोटारीने किल्ले राजकोटकडे प्रयाण, दुपारी १२.३० वाजता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभास उपस्थित राहणार. दुपारी १.१५ वाजता, टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड हेलिपॅड, मालवण येथे आगमन व हेलिकॉप्टरने गोशाळा हेलिपॅड, कणकवलीकडे प्रयाण, दुपारी १.४० वाजता, गोवर्धन गोशाळा कोकण उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी ३.१५ वाजता, चिपी विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.