वेंगुर्ले,ता.१०: इंडियन रेडक्रॉस सोसायटी सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने कुडाळ हायस्कुल, कुडाळ येथे आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थापक हेनरी ड्युनांट यांच्या प्रतिमेला उपस्थित पदाधिकारी उपाध्यक्ष प्राचार्य सुभाष गोवेकर, सचिव डॉ राजेंद्र गावस्कर, ॲड. नंदन वेंगुर्लेकर, लेखापाल केशव फाटक प्रभूतीच्या वतीने पुष्पहार व आदरांजली वाहण्यात आली.
रेडक्रॉस ची मानवता, स्वातंत्र्य, निष्पक्षपातीपणा, एकात्मता सर्वव्यपकता आदी मूलभूत तत्वांचा उजागर करण्यात आला. सचिव डॉ. गावस्कर यांनी इंडियन रेडक्रॉस चे राष्ट्रीय प्रधान सचिव डॉ जैन दिल्ली, यांनी या निमित्त कार्यकर्ते व पदाधिकारी याना दिलेल्या संदेशाचे वाचन केले आणि. सद्य युद्धजन्य परिस्थितीत आपदकालीन सहाय्यता, नागरी सुरक्षा, प्रथमोपचार यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाला घेणे अनिवार्य असल्याचे सांगून रेडक्रॉस त्यसंदर्भात विनामूल्य व योग्य प्रशिक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. तसेच आता देशात निर्माण झालेली युद्धसदृश परिस्थिती पाहता मोठया प्रमाणावर रक्ताची आवश्यकता लागणार असल्याने संस्थे तर्फे मोठया प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तपेढी सुसज्ज करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे ठरवण्यात आले. समारोहानंतर कार्यकारिणी सदस्यांची बैठक होऊन गत कार्याचा आढावा व आगामी कार्यधोरण बाबत नियोजन करण्यात आले.
ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने सभासद व हितचिंतक उपस्थित होते.