Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याडायल ११२ वर खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध कुडाळ पोलीसांची कारवाई...

डायल ११२ वर खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध कुडाळ पोलीसांची कारवाई…

कुडाळ,ता.१०: डायल ११२ वर खोटी माहिती देऊन पोलीस प्रशासनाच्या वेळेचा व मनुष्यबळाचा दुरुपयोग केल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी नितीन सहदेव तांबे (वय ५०, रा. भडगांव-बुद्रुक टेंबवाडी ता. कुडाळ) याच्यावर कारवाई केली आहे. त्याच्या विरुद्ध तपास करण्याची मंजुरी न्यायालयाकडून घेण्यात आली असून संबंधिताच्या विरुद्ध त्याने केलेल्या गुन्ह्याबाबत तपास करण्यात येत आहे, अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, डायल ११२ वर खोटी माहिती देवुन पोलीस प्रशासनाच्या वेळेचा व मनुष्यबळाचा दुरुपयोग करतात. ९ मे ला डायल ११२ वर “इंडिया को उडाना है! ईनशा अल्लाह, मेरे भाईजान आ रहे है..!!” असा फोन आला. सद्या भारत पाकिस्तान या देशाचे युदध सुरु असल्याने संबंधित फोनचा कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी गंभीर दखल घेवुन तात्काळ संबंधित फोन करणाऱ्या इसमाचा शोध सुरु केला. त्यावेळी संबंधित फोन करणारा तांबे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने संबंधित माहिती ही खोडसाळपणाने दिलेली असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत संबंधिताने कुडाळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. संबंधित गुन्ह्याचा तपास करण्याची मंजुरी न्यायालयाकडून घेण्यात आलेली असुन संबंधित याचे विरुद्ध त्याने केलेल्या गुन्ह्याबाबत तपास करण्यात येत आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग कृषिकेश रावले उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाणे राजेंद्र मगदुम, पोलीस अंमलदार मंगेश जाधव, जनार्दन झारापकर, संजय कदम, रुपेश सारंग, योगेश मांजरेकर यांनी केलेली आहे. डायल ११२ ही सुविधा नागरीकांना त्यांचे आपतकालीन कालावधीमध्ये तात्काळ पोलीस मदत मिळावी या हेतुने शासनाने सुरु केलेली आहे. त्यामुळे कोणीही संबंधित सुविधेचा दुरुपयोग करुन खोटी माहिती पोलीस प्रशासनाचा देवु नये, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी केलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments