निवडणूक रणांगणाला घाबरणाऱ्या नाईकांचा पराभव करणारच…

89
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दत्ता सामंत ; रणजीत देसाईंच्या प्रचाराला वराडमध्ये उत्तम प्रतिसाद…

मालवण, ता. १३ :

मालवण तालुक्याचा सुपुत्र अनेक वर्षांनी आमदार होणार असल्याने उमेदवारी अर्ज भरताना मालवणातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. परंतु यामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या आम. वैभव नाईक यांनी पालकमंत्री, खासदार यांचा उपयोग करून माझा अर्ज बाद करण्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर दबाव आणला. त्यामुळे मालवणची जनता चिडली आहे. निवडणूक रिंगणात न उतरताच मालवणच्या सुपुत्राला बाद केल्याचा राग जनतेच्या मनात खदखदत आहे. परिणामी निवडणूक रणांगणाला घाबरलेल्या आम. नाईक यांचा पराभव करण्याचा विडा येथील जनतेने घेतला आहे, अशी टीका दत्ता सामंत यांनी वराड येथे केली.
भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजीत देसाई यांच्या प्रचारार्थ सामंत यांनी वराड गावाला भेट दिली. यावेळी त्यांना मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, स्वाभिमान तालुकाध्यक्ष राजा गावडे, राजन माणगांवकर, भाऊ सामंत, मंदार लुडबे, राजू देसाई यांच्यासह शेकडोंनी पदाधिकारी-कार्यकर्ते पुरुष व महिला उपस्थित होत्या.
श्री. सामंत यांनी, ‘खोटे बोला पण रेटून बोला’ हा आम. नाईक यांचा डाव जनतेने ओळखला आहे. केवळ खोटे बोलून ते आमदार झाले. पुढे पाच वर्ष ते खोटेच बोलत राहिले. मतदार संघातील गरजा ते ओळखू शकले नाहीत. त्यामुळे प्रमुख विकास रखडला. परिणामी जनतेसमोर जाताना आता त्यांना काय घेवून जावे ? हे समजत नाही. त्यांची आमदारकी संपली आहे. तरी आता ते लोकांना कामे वाटत आहेत. तुमचे काम मंजूर केल्याचे खोटे पत्र देवून प्रवेश घडवत आहेत. मात्र, येथील जनतेनेच खोटे बोलणारा व स्थानिक उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दबाव आणून बाद करणारे पार्सल आमदार नको, असे ठरविले आहे. त्यामुळे रणजीत देसाई हे भाजप पुरस्कृत उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

\