वैभववाडीसह भुईबावडा येथे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन…

75
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी ता.१३: 

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी शहरासह उंबर्डे ते भुईबावडा येथे रविवारी पोलिसांनी संचलन केले.
निवडणूक आयोगाने होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी वैभववाडी शहरासह उंबर्डे ते भुईबावडा येथे पोलिसांनी संचलन केले. जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक श्री. दिक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलिस अधिक्षक श्री. तुषार पाटील, उपविभागीय अधिकारी श्री. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संचलन केले.
सदर संचलनात गोवा राज्याचे सिंधुदुर्गात बंदोबस्तासाठी आलेले ३ अधिकारी तसेच ६० कर्मचारी, वैभववाडी पोलिस ठाण्याचे १ अधिकारी, १७ कर्मचारी व ३३ होमगार्ड उपस्थित होते. वैभववाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांच्या नेतृत्वाखाली संचलन शिस्तबद्ध पार पडले.

\