कणकवलीत भाजपचाच आमदार असणार

241
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अतुल काळसेकर ः तेली, देसाईंनाही फायदा होणार

कणकवली, ता.13 ः प्रधानमंत्री भाजपचा, मुख्यमंत्री भाजपचा तसेच कणकवलीचा आमदार देखील भाजपचाच असणार आहे. याखेरीज कुडाळमध्ये रणजित देसाई आणि सावंतवाडी मतदारसंघात राजन तेलींच्या प्रचारासाठी पूर्णतः ताकदीने भाजप कार्यकर्ते उतरले आहेत. त्यामुळे कणकवलीत नीतेश राणे हे आमचे हक्काचे आमदार असणार आहेत. तर तेली, देसाईंनाही निश्‍चितपणे फायदा होईल अशी ग्वाही भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी येथे दिली. तसेच भाजपचे बंडखोर संदेश पारकर, अतुल रावराणे यांचीही लवकरच हकालपट्टी होणार असल्याचे ते म्हणाले.
श्री.काळसेकर यांनी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर भाजपचे कार्यकर्ते सक्षमपणे काम करत आहेत. बुथ कार्यकर्त्यांची सर्वात मोठी ताकद भाजपकडे आहे. तर कणकवलीत आमदार नीतेश राणे हे कमळ निशाणीवर निश्‍चितपणे निवडून येतील. तर कुडाळमध्ये रणजित देसाई आणि सावंतवाडीत राजन तेली यांनाही फायदा होणार आहे. दरम्यान भाजपचे युवा नेते संदेश पारकर आणि अतुल रावराणे हे शिवसेना उमेदवाराचा प्रचार करत आहेत. त्यांची पक्षातून लवकरच हकालपट्टी होईल असे श्री.काळसेकर म्हणाले.

\