नीतेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री कणकवलीत येणार

81
2
Google search engine
Google search engine
Google search engine
  1. उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणावर 15 ऑक्टोबरला सभा

कणकवली, ता.13 ः कणकवली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 15 ऑक्टोबरला कणकवलीत येत आहेत. दुपारी 12.30 वाजता उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणावर त्यांची जाहीर सभा होईल. यंदाच्या निवडणुकीत सिंधुदुर्गातील ही सर्वांत मोठी सभा असणार आहे. तसेच मुख्यमंत्री येणार नाहीत या विरोधकांच्या अफवेला काही अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांच्या सभेतच स्वाभिमान पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण होईल आणि सिंधुदुर्गात भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी आज दिली.
कणकवली येथील भाजप कार्यालयात बोलताना श्री.काळसेकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या सभेची आमच्या पेक्षा विरोधकांनाच अधिक काळजी होती. त्यामुळेच मुख्यमंत्री येणार नाहीत अशा चर्चा आणि अफवा पसरविल्या जात होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्‍चित आहे. 15 ऑक्टोबरला उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणात त्यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेला भाजपा नेते नारायण राणे, संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

\