शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ आॅक्टोबरला सिंधुदुर्गात…

2

तिन्ही मतदार संघात सभा : काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचा लक्ष…

कणकवली, ता.१३ : सिंधुदुर्गात शिवसेनेचे तिनही विधानसभेमध्ये उमेदवार असल्याने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे १६ आॅक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. १६ आॅक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता कणकवली गडनदी पात्रानजीकच्या मैदानात उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे़ विशेषत: राज्यात महायुती असताना कणकवलीत महायुती तुटली असून भाजपा उमेदवाराविरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कणकवलीतील सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
कणकवलीतील सभा संपल्यानंतर कुडाळ विधानसभा महायुतीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ ४.३० वाजता सभा होणार आहे. त्यानंतर सावंतवाडीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ सायंकाळी ७ वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेला शिवसेना नेते नाम. सुभाष देसाई, खास. संजय राऊत, खास. विनायक राऊत, आम. उदय सामंत, सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर यांच्यासह राज्यातील शिवसेना नेते उपस्थित राहणार आहेत.

6

4