Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेरवली- विलवडे रेल्वे मार्गावर दरड कोसळली…
रत्नागिरी, ता. २० : मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. आज सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील वेरवली आणि विलवडे यादरम्यान मांडवकर वाडी बोगद्याच्या पुढे कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळली. यामुळे रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. जनशताब्दी तेजस आणि इतर काही गाड्या विलंबाने धावत आहेत. कोकण रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार दरड काढण्याचे काम पूर्ण झाले असून रेल्वे मार्ग सुरळीत करण्यात आला आहे. मात्र अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.