Monday, June 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामळगाव घाटात पावसामुळे वाहतूक विस्कळीत...

मळगाव घाटात पावसामुळे वाहतूक विस्कळीत…

ठाकरे गट आक्रमक, बांधकाम खात्यावर खापर..

सावंतवाडी,ता.२०: माजगाव-मळगाव रस्त्यावरील मळगाव घाटात आज मुसळधार पावसामुळे दरड कोसळून दगडगोटे आणि माती रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारकांची चांगलीच धांदल उडाली. या घटनेमुळे ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांची ‘पोलखोल’ झाल्याचे म्हटले आहे.
राऊळ यांनी निदर्शनास आणून दिले की, मळगाव घाटात गटार नसल्यामुळे यापूर्वीही एकदा पावसाचे पाणी जाऊन मोरी कोसळली होती आणि काही दिवस रस्ता बंद होता. सार्वजनिक बांधकाम खात्याला आणि वन खात्याला याची माहिती असूनही, त्यांनी गॅस पाईपलाईन गटाराच्या बाजूने, गटारातून टाकण्यास परवानगी दिली, ही एक मोठी चूक होती असे राऊळ म्हणाले.
आजच्या घटनेमुळे रस्त्यावर आलेल्या माती आणि दगडांमुळे लहान अपघातही झाले. गॅस पाईपलाईनमुळे गटार बंदिस्त झाल्याने पाणी रस्त्यावर आले आणि गटारात साचलेली माती, दगड रस्त्यावर आल्याने हे अपघात घडल्याचे राऊळ यांनी सांगितले. यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते आणि वन खाते जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
पावसाच्या पहिल्याच दणक्यात ही सत्यस्थिती जनतेसमोर आली आहे. आता तरी बांधकाम खात्याने यावर योग्य तो निर्णय घेऊन वाहनचालकांना या घाटातून सुरक्षितपणे प्रवास करता येईल याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन रुपेश राऊळ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments