कणकवली-सावंतवाडी एसटी बसला पावशी येथे अपघात…

80
2
Google search engine
Google search engine
Google search engine

स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे घडला प्रकार;मोठा अनर्थ टळला…

कुडाळ ता.१४: कणकवलीहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसचे स्टेरिंग लॉक झाल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला कलंडली.हा अपघात आज सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे घडला.मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला.
अपघातग्रस्त बस कणकवलीतुन-सावंतवाडीच्या दिशेने येत होती.दरम्यान बसचे स्टेरिंग अचानक लॉक झाल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला व हा अपघात घडला.मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

\