नितेश राणेंकडून जीवितास धोका

2

सतीश सावंत : जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी

कणकवली, ता.१४ :

कणकवली विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांच्याकडून खोटे पुरावे निर्माण करून चुकीच्या आणि बेकायदेशीर तक्रारी केल्या जात आहेत. तसेच त्यांच्याकडून आपल्या जीवितासही धोका आहे. त्यामुळे आपणास पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी सतीश सावंत यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनातून केली आहे.
श्री.सावंत यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नितेश राणे यांची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी तसेच त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांची पार्श्‍वभूमी पाहता यापुढे त्यांच्याकरवी मला मारहाण होऊन कधीही जीविताची हानी होऊ शकते. राणेंविरोधात आपण निवडणूक लढवत असल्याने आपल्या विरोधात त्यांच्या मनात प्रचंड क्रोध आणि राग निर्माण झाला आहे. त्यांच्या वर्तवणुकीतूनही तो दिसत आहे. अशा परिस्थितीत माझ्या व माझ्या परिवाराला जीवित हानी व धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मला कुठूनही व कोणामार्फतही नितेश राणे यांच्याकरवी दगाफटका होण्याची दाट शक्यता आहे.

2

4