मालवण, ता. २२ : येथील रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या वतीने उद्या सकाळी १० ते २ यावेळेत रेडकर हॉस्पिटल येथे सांधे, मणके, हाडांच्या आजारासाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरात अस्थिरोग तज्ञांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे. शिबिरातील वैद्यकीय तज्ज्ञ हे ऑर्थोपेडिक सर्जन स्पोर्ट्स इंजुरी स्पेशालिस्ट आहेत. तसेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात निपुण आहेत. ते रेडकर हॉस्पिटल येथे रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. शिबिरात हाडांची घनता तपासणी, रक्तातील साखर, ईसीजी, एक्स रे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलत, तज्ञ फिजिओथेरपीस्टकडून फिजिओथेरपी बाबत मोफत सल्ला दिला जाणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी ०२३६५ – २५२११५ किंवा ७५८८५४४७०० येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.