सावंतवाडी,ता.२२: कारिवडे गावाचे सुपुत्र आणि ऑपरेशन सिंदूर मधील महत्त्वाचे भागीदार, सुभेदार मेजर संजय सावंत यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विशेष कौतुक केले आहे. संजय सावंत यांच्या टीमने केलेल्या कामगिरीची दखल घेत राजनाथ सिंह यांनी त्यांना विशेष शाबासकी दिली.
सुभेदार मेजर संजय सावंत आणि त्यांच्या टीमने ऑपरेशन सिंदूरमध्ये अचूक नियोजन आणि कार्यवाही केली. या ऑपरेशनमध्ये त्यांनी पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल अचूक निशाणा साधून जमीनदोस्त केले. श्री. सावंत यांच्या नेतृत्वाखालील टीमने केलेल्या कार्यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत झाली आहे, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या शौर्याबद्दल आणि समर्पित सेवेबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.