सावंतवाडी,ता.२४: मालवणी कवी दादा मडकईकर यांचा “सुर्गेंचो वळेसार” मालवणी काव्यसंग्रह व ४५० म्हणींचा संग्रहाचे प्रकाशन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री- मुंबई उपनगर आशिष शेलार यांच्या हस्ते सोमवार २६ मे ला सायंकाळी ६:०० वा.पु ल देशपांडे साहित्य अकादमी येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. ‘सुर्गेची वळेसार’ मालवणी काव्यसंग्रह व ४५० म्हणींचा संग्रहाचे प्रकाशन मंत्री शेलार करणार आहेत. दादा मडकईकर यांनी ‘चांन्याची फुला’, ‘आबोलेचो वळेसार’, ‘कोकण हिरवेगार’ असे मालवणी काव्यसंग्रह लिहिले आहेत. आपल्या खास शैलीनं रसिकांच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कोकणातली लोकसंस्कृती, सणवार, परंपरा, लोककला आणि इथला निसर्ग त्यांनी आपल्या काव्यातून उलगडला आहे. आता सुर्गेंच्या वळेसारातून कवितांचा सुगंध सातासमुद्रापार दरवळला जाणार आहे.