वेंगुर्ले, ता.२४: येथील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष तुळस येथील अवधूत मराठे यांनी आपल्या पक्ष सदस्य पदाचा आणि पंचायत समिती विभागीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मराठे यांनी दिलेल्या राजीनाम्यात असे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट या पक्षात काम करण्याची संधी आपल्याला मिळाली त्याबद्दल आभार, परंतु लोकांची विकासकामे होत नसल्यामुळे आमची पक्षात ओढाताण होत आहे. म्हणून मी राजीनामा देत आहे. अवधूत मराठे यांच्या सोबत सर्व तुळस बुथ अध्यक्ष महिला अध्यक्ष यांचेही राजीनामे सर्वजण देणार आहेत. अवधूत मराठे यांचे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. त्यामुळेच ते आता भाजपात जाणार हे निश्चित आहे.
अवधूत मराठे भाजपात जाणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES